शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 21:29 IST

एक्झिट पोलने नाशिक महापालिकेची सत्ता कायम राखण्यात महायुतीकडे जाण्याचा अंदाज मांडला आहे. एक्झिट पोलनुसार शिंदेसेना सर्वाधिक जागा तर भाजपा दोन नंबरचा पक्ष होऊ शकतो.

नाशिक महानगर पालिकेसाठी आज मतदान पार पडले. आता सर्वांच्या नजरा या उद्या येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. या आधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. नाशिकमध्ये शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

साम टीव्हीचा एक्झिट पोलनुसार शिंदेसेनेला ५५ तर भाजपला ५२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ५, ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.

एक्झिट पोलने नाशिक महापालिकेची सत्ता कायम राखण्यात महायुतीकडे जाण्याचा अंदाज मांडला आहे. एक्झिट पोलनुसार शिंदेसेना सर्वाधिक जागा तर भाजपा दोन नंबरचा पक्ष होऊ शकतो.

राष्ट्रवादीला ५ जागांचा अंदाज 

सामच्या एक्झिट पोलने नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त ५ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. तर  ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.

दोन्ही ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरांना आवाहन केले होते.  उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तयारी केली होती. पण, एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंना फक्त ७ जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. 

पुण्यात कुणाला किती जागा?

भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे महापालिकेत कोण सत्तेवर बसणार, याचे उत्तर काही तासांतच मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलने निकालाचे अंदाज मांडले आहेत. दोन एक्झिट पोलने पुण्यात भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातच थेट लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा पुण्याची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील का? याकडे सगळ्याचे लक्ष आहे. 

कोण किती जागा जिंकू शकते?

भाजपा - ९१

राष्ट्रवादी (अजित पवार) - ४३

शिवसेना - ७

काँग्रेस ८

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Election: Thackeray Brothers' Rally, BJP-Shinde Sena Seat Prediction

Web Summary : Exit polls predict Shinde Sena leading in Nashik Municipal Corporation. BJP follows. Ajit Pawar's NCP is expected to win 5 seats. Pune may see BJP retain power with 91 seats.
टॅग्स :Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026BJPभाजपाShiv Senaशिवसेना