शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:05 IST

शिंदेसेना, राष्ट्रवादी युतीवर आज होणार शिक्कामोर्तब, मविआचे गणित जमेना

नाशिक : भाजपकडून एकीकडे सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा विचार प्रबळ होत असतानाच रात्रीपर्यंत शिंदेसेनेसमवेत युतीच्या निर्णयाबाबत फारसे प्रयत्न झाले नाहीत. पार्श्वभूमीवर युतीत जागा कमी मिळण्याच्या शक्यतेने त्यातील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने रात्री उशिरापर्यंत भुजबळ फार्म हाऊसवर चर्चा केल्यावर ५९ टक्के जागा शिंदेसेना आणि ४१ टक्के जागा राष्ट्रवादी या फॉर्म्युलावर सहमती झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दरम्यान, मविआच्या आघाडीवर आधी डॉ. बच्छाव यांच्या घरी आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या कार्यालयात बैठका होऊनही जागावाटप निश्चित होत नसल्याने मविआ आघाडीचा फॉर्म्युला सोमवारीच निश्चित होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून अखेरचे दोन दिवसच उरत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारचा दिवस प्रचंड उलथापालथींचा आणि चर्चा, महाचर्चासह जागावाटपाच्या काथ्याकुटाचा ठरला. भाजपसमवेत महायुती करण्यास उत्सुक घटकपक्षांना रात्री उशिरापर्यंत चर्चेची संधीच मिळाली नाही. रात्री गिरीश महाजन हे नाशिकला दाखल झाल्यानंतरही त्यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमवेतची प्रस्तावित बैठक झाली नाही. त्यामुळे अखेरीस शिंदेसेनेकडून उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, हेमंत गोडसे, बंटी तिदमे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून समीर भुजबळ, औषध मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यात प्रदीर्घ काळ चर्चा झाली. त्यानुसार शिंदेसेनेने सुमारे ६१ टक्के, तर अजित पवार गटाने सुमारे ३९ टक्के जागा लढण्यावर सहमती दर्शवली.

दरम्यान, तिसरीकडे, उद्धवसेनेसह मविआचे गणित जमविण्यासाठी दुपारपासून सायंकाळपर्यंत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या बंगल्यावर त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या मुंबई नाक्यावरील कार्यालयात बैठक होऊनही निर्णय झाला नाही.

शिंदेसेनेत प्रवेश

रविवारी कविता कर्डक, सतनाम राजपूत, नीलिमा आमले, सागर देशमुख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने या जागांमध्ये भाजपमधून तिकीट न मिळाल्याने शिंदेसेनेकडे आलेल्या इच्छुकांचाही समावेश असल्याची चर्चा होती.

भाजपकडून ८४/६/३२ अशा ऑफरची चर्चा

महायुतीतील बैठकांमध्ये भाजपा ८२, राष्ट्रवादी अजित पवार ६, तर शिंदेसेना ३४ असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते; परंतु त्यावर एकमत न झाल्याने सोमवारी (दि. २९) या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महायुतीत लढल्यास शिंदेसेनेसह अजित पवार राष्ट्रवादी गटाची तडजोड करण्याची तयारी असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत भाजपचे नेते गिरीश महाजन रविवारी नाशिकला येऊन तिढा सोडवणार होते. मात्र, मध्यरात्रीपर्यंत भुसे यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

बंडखोरी टाळण्यासाठी एबी फॉर्मवर प्रिंटेड नाव

बंडखोरी आणि एबी फॉर्मची पळवापळवी टाळण्यासाठी भाजपकडून एबी फॉर्मवर उमेदवाराचे नाव प्रिंट करून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी हे अर्ज कोअर कमिटीच्या सदस्यांकडे देत ते वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे समजते.

मविआची मोट बांधण्याचा उद्धवसेनेसह काँग्रेसचा प्रयत्न; कमी जागांमुळे मनसेची कोंडी

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका रविवारी दिवसभर झाल्या. यात आघाडी करण्यावर बऱ्याच अंशी सहमती झाली. मात्र, जागांचा तिढा सुटला नाही. विशेष म्हणजे मनसेला आघाडीत घेण्यावरून काँग्रेसचा राज्यात अनेक ठिकाणी विरोध असला तरी नाशिकमध्ये मात्र मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी होकार दिला आहे.

काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन स्थापन सपकाळ यांनी आघाडी करण्यासाठी समन्वयाची जबाबदारी दिल्यानंतर आघाडीच्या नेत्यांना त्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले, त्यांच्या उपस्थितीत बैठका रविवारी पार पडल्या. मविआचा जागावाटपाचा तिढा सुटलाच नाही. तर मनसे अन् उद्धवसेना एकत्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.

राष्ट्रवादीने (शरद पवार) व काँग्रेसने प्रत्येकी २५ ते २८ जागांसाठी, तर उद्धवसेनेने ४५ जागांसाठी हट्ट धरला. त्यामुळे मनसे उरलेल्या २० ते २१ जागांवर समाधानी होईल का? याशिवाय माकपाला दोन जागा सोडाव्या लागणार आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न बैठकीत चर्चेला आले. मनसेने देखील ३० जागांची मागणी केली असल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले. तर मनसेचे शहाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याशी 'लोकमत' प्रतिनिधीने चर्चा केली असता आम्हीदेखील ४० ते ४५ जागांवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

मविआत १५ ते २० जागावाटपाचे घोडे अडल्याने बैठकांमधून निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादीचे निरीक्षक सुनील भुसारा है नाशिकला दाखल होणार असून त्यानंतरच मविआचा अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादी (शरद पवार) समवेत दोनदा बैठक

१. चर्चेची पहिली फेरी सकाळी राष्ट्रवादी (शरद पवार) गटासोबत काँग्रेसची झाली. त्यात शहरात दोघा पक्षांची ताकद कोणत्या प्रभागात, एकूण जागांची मागणी व मनसे, उद्धवसेनेला द्यावयाच्या जागा यावरून खल चालला.

२. या चर्चेत काँग्रेसकडून खासदार डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद आहेर, स्वप्निल पाटील, तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचा सहभाग होता.

तर उद्धवसेना ७०, मनसे ४२

महाविकास आघाडीकडून जागांचा तिढा सुटला नाही अन् आघाडीत बिघाडी झाली तर मनसे अन् उद्धवसेनेने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्धवसेना ७० जागांवर ठाम असून, मनसेला ४० जागा देण्यावरून खल सुरू आहे.

उद्धवसेनेसोबत पाच तास खल

दुपारी २ वाजेपासून पुढचे पाच तास खासदार डॉ. बच्छाव यांच्या निवासस्थानी उद्धवसेनेसोबत काँग्रेसची बैठक झाली. त्यात उद्धवसेनेकडून सन्मापूर्वक जागांची मागणी पुढे आली. तीन तास बैठक चालली. उद्धवसेनेकडून बैठकीत ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते सहभागी झाले. सायंकाळी राष्ट्रवादीशी (शरद पवार) चर्चा झाल्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांनी पुन्हा उद्धवसेनेसोबत चर्चा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Alliance Talks: Seat-Sharing Formulas Emerge Amidst Uncertainty

Web Summary : Maharashtra's political alliances face deadlock. Shinde Sena, NCP explore seat-sharing. MVA struggles for consensus. BJP remains aloof, fueling speculation. Intense negotiations continue, deadlines loom, and final decisions await.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६