शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

Nashik: मनपाच्या अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर

By suyog.joshi | Published: February 06, 2024 11:57 AM

Nashik News: सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली.

-  सुयोग जोशी नाशिक - सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली. रूजू होताच त्यांनी ॲक्शन घेत मनपा मुख्यालयातील त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागात प्रत्यक्ष जाऊन कामांची माहिती घेतली. पिंप्री चिंचवड येथून आलेल्या स्मिता झगडे यांनी शुक्रवारी (दि.२) मनपात येऊन अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.

यानंतर शनिवारी व रविवार सुट्टी आली होती, तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. दरम्यान आपण मनपा आयुक्तांसह सर्व अधिकारी व सेवकांना सोबत घेऊन नाशिक शहराच्या दृष्टीने चांगले काम करणार असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे स्वच्छ शहरांमध्ये आपले नाव येण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झगडे यांच्याकडे आरोग्य, अग्निशमन, घनकचरा संकलन, मलेरीया यासारखे महत्वाचे विभागाचे कामकाज आहे. शहराचा कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू झालेला आहे.

मात्र मागच्या वेळी सुमारे पावणे दोनशे कोटींचा ठेका यंदा तब्बल सुमारे ३५० कोटींवर गेलेला आहे. त्यावेळी तो चर्चेचा विषय बनला होता. सुमारे २५ लाख लोकसंख्या झालेल्या नाशिक शहराचा कारभर हाकणाऱ्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (सेवा) हे पद मागील सुमारे सहा महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे इतर वरिष्ठ अधिकार्यांवर कामाचा ताण निर्माण झाला होता. मात्र झगडे यांची नियुक्ती झाल्यानंतर इतर अधिकाऱ्यांचाही भार कमी झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक