नाशिक - मुंबई महामार्ग दुरुस्तीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:07 IST2020-09-12T21:52:50+5:302020-09-13T00:07:09+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे व घोटी टोल प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत तत्काळ कामास प्रारंभ करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

घोटी येथील टोल प्रशासनाने महामार्ग दुरूस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित तुकाराम वारघडे यांच्यासहटोल प्रशासनाचे अधिकारी.
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे व घोटी टोल प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत तत्काळ कामास प्रारंभ करण्यात आल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काम सुरू न झाल्यास शनिवारी (दि.12) रोजी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या निवेदनाची आमदार खोसकर यांनी दखल घेत घोटी टोल प्रशासनाला धारेवर धरत प्रत्यक्षात महामार्ग दुरूस्तीच्या कामास प्रारंभ करण्यास सांगितले. यामुळे होणारे आंदोलन स्थ्गित करण्यात आले आहे.
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची अतिशय बिकट अवस्था झाली असून या महामार्गावरून वाहनधारकांना कसरत करावी लागते. यामुळेच प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तत्काळ दुरुस्तीची मागणी करण्यातअआली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिआ होता, मात्र आमदार व घोती टोल प्रशासनाने दखल घेत काम सुरू झाल्याने समाधान वाटले आहे.
- तुकाराम वारघडे, जिल्हाउपाध्यक्ष, आदिवासी संघटना