नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा
By संजय पाठक | Updated: April 19, 2023 14:10 IST2023-04-19T14:02:31+5:302023-04-19T14:10:05+5:30
दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता.

नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा
नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये सत्ता मिळवली होती. त्यानंतर पक्षाची अवस्था बिकट असली तरी गटबाजी मात्र थांबलेली नाही. त्यातच मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.
दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये मनसेच्या माध्यमातून पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी शहराध्यक्षपदी नियुक्त केले होते. नाशिकमध्ये मनसेत मोठ्या प्रमाणात गटबाजी असून त्याची वेळोवेळी चर्चा होत असते, त्यातच दातीर यांनी राजीनामा दिल्यामुळे उलट सुलट चर्चा होत आहे.
दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता आपला व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा दिला असून आपण पक्ष सोडलेला नाही. पुढील आठवड्यात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.