शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नाशिकमध्ये महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांचेरात्रीपासून उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:30 IST

नाशिक - नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधकांनी देखील साथ दिली असून त्यामुळे आंदोलन नक्की कोणाचे आणि कोणाच्या विरोधात हेच पालिका वर्तुळाला संभ्रमात टाकणारे ठरले आहे. भाजपाने आता नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याप्रकाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देसभागृह नेतेच आंदोलनातधार्मिक संस्थांचा पाठींबाआज मध्यस्थीची शक्यता

नाशिक -नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधकांनी देखील साथ दिली असून त्यामुळे आंदोलन नक्की कोणाचे आणि कोणाच्या विरोधात हेच पालिका वर्तुळाला संभ्रमात टाकणारे ठरले आहे. भाजपाने आता नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याप्रकाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी साकडे घातले आहे.

महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.२५) महासभा पार पडली. यावेळी शहरातील बेकायदा ठरविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना पाडू नये, सेंट्रल किचन योजना रद्द करून बचत गटांनाच हे काम द्यावे, सिडकोतील स्वतंत्र बांधकाम नियंत्रण नियमावली कायम ठेवावे आणि महापालिकेच्या सील केलेल्या मिळकती त्वरीत खुल्या कराव्यात या मागणीसाठी रात्री पाटील यांनी अचानक महापौरांच्या पिठासनाच्या पुढ्यात बसून आंदोलन सुरू केले. त्यांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे माजी गटनेते सलीम शेख पाटील यांच्या प्रभागातून निवडून आलेले रविंद्र धिवरे यांनी साथ दिली. काही काळ वर्षा भालेराव यांनी देखील आंदोलन केले.

सभागृहात रात्रीपासून सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. या बाबत महापौर रंजना भानसी व अन्य भाजपा नेते आज मधस्थी करू शकतात पण याला यश मिळेल का नाही हे आता स्पष्ट होत नाही.दुसरी कडे या उपोषणाला काही धार्मिक संघटना एकत्र होऊन पाठिंबा देणार आहे.यावर प्रतिक्रि या देताना गजानन शेलार यांनी सांगितले की हे उपोषण समाज हिताच्या दृष्टीने सुरू केले आहे.पण महापौर रंजना भानसी यांना आपली दंडेलशाही वापरून नाशिक शहराचे भले करावयाचे नाही हे एकुण कृती वरून दिसत आहे, असे सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार