शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: जिममध्ये ओळख केली, पुढे मैत्री झाली, प्रेमाचा बनाव, अन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By अझहर शेख | Updated: November 7, 2023 18:45 IST

Nashik Crime News: एका जिममध्ये पीडित महिलेसोबत ओळख करून पुढे मैत्री वाढवत नंतर प्रेमाचा बनाव रचून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून पीडितेला तीनदा गर्भवती केल्याची घटना घडली.

- अझहर शेख  नाशिक - एका जिममध्ये पीडित महिलेसोबत ओळख करून पुढे मैत्री वाढवत नंतर प्रेमाचा बनाव रचून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून पीडितेला तीनदा गर्भवती केल्याची घटना घडली. संशयिताने पीडित महिलेला तीनवेळेस गर्भपात करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. इंदिरानगर पोलिसांनी संशयित इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 एका जिममध्ये जाणाऱ्या महिलेसोबत संशयित संदीप दिघे याने २०२१ ते २०२२ या कालवधीत ओळख करून पुढे मैत्रीतून प्रेमाचा बनाव करत जवळीक वाढविली. यादरम्यान संदीप याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यावेळी तो स्वत: विवाहित होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोरोना काळात पीडितेला कोरोना झाला असता संशयित संदीप हा तीची काळजी करत रुग्णालयात ये-जा करून देखभाल करत होता. नोव्हेंबर २०२१साली त्याने पीडितेच्या खोलीवर येत शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतर वेळोवेळी महिलेसोबत संभोग करत तिला जानेवारी २०२२ साली गर्भवती केले. ही बाब पीडितेने संदीपच्या लक्षात आणून दिली असता ‘तुझ्या घरच्यांना सांगून टाकू तेव्हा आपण सर्वांना विश्वासात घेऊन सांगू असे सांगत सध्या बाळ नको...’ म्हणून पटवून देत गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर ऑगस्ट २०२२साली पुन्हा पीडितेचा गर्भपात करण्यात आला. त्यावेळी संशयित संदीपचे अजुन एका महिलेसोबत अफेअर सुरू असल्याचे पीडितेच्या लक्षात आल्याने पीडितेने त्यास विचारणा केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पीडित महिला त्याच्यापासून गर्भवती झाली, हे त्याला समजले असता त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. बळजबरीने खाद्यपदार्थामध्ये गर्भपाताच्या गोळ्या टाकून दिल्याने महिलेचा तिसऱ्यांदा गर्भपात झाला, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित संदीपविरुद्ध बलात्कार व गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहेे. पुढील तपास इंदिरानगर पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक