पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी विक्रीसाठी आलेल्या भोपळा मालाच्या प्रति जाळीला अवघा रूपये असा बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारसमितीतील सेल हॉलमध्ये भोपळा फेकून काढता पाय घेतला.नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी भोपळा माल दाखल झाला होता. चांगल्या प्रतिचा माल 40 रूपये जाळी दराने विक्री झाला तर काही प्रमाणात हलक्या असलेल्या भोपळा जाळीला 10 रूपये असा बाजारभाव मिळाला तर काही मालाकडे व्यापारी वर्गाने बघितले नाही व त्या मालाचा लिलाव न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भोपळा मालाच्या जाळया बाजारसमितीच्या सेल हॉलमध्ये फेकून देत संताप व्यक्त करून काढता पाय घेतला.लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच वाहन भाडेही न सुटल्याने भोपळा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.उठाव नसल्याने बाजारभाव कोसळलेनाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी भोपळा मालाची मोठया प्रमाणात आवक झाली होती. गुरूवारी होळी असल्याने शेतमालाला उठाव नाही. त्यातच हलक्या प्रतिचा भोपळा असल्याने त्या मालाचा लिलाव न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भोपळा बाजारसमितीतील सेल हॉलमध्ये फेकून दिला.उमापती ओझा, व्यापारी
नाशिक बाजारसमिती : बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी फेकला भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:31 IST
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी विक्रीसाठी आलेल्या भोपळा मालाच्या प्रति जाळीला अवघा रूपये असा बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारसमितीतील सेल हॉलमध्ये भोपळा फेकून काढता पाय घेतला.नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी भोपळा माल दाखल झाला होता. चांगल्या प्रतिचा माल 40 रूपये जाळी दराने विक्री झाला तर काही प्रमाणात ...
नाशिक बाजारसमिती : बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी फेकला भोपळा
ठळक मुद्दे10 रूपये जाळीउठाव नसल्याने बाजारभाव कोसळले