Nashik: संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते महापूजा

By प्रसाद गो.जोशी | Updated: February 6, 2024 12:52 IST2024-02-06T12:51:30+5:302024-02-06T12:52:48+5:30

Nashik News: त्र्यंबकेश्वर  येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेनिमित्त समाधीची शासकीय महापूजा  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे महापूजा करण्यात आली.

Nashik: Mahapuja of Saint Nivrittinath's Samadhi by Guardian Minister Bhuse | Nashik: संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते महापूजा

Nashik: संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते महापूजा

- वसंत तिवडे
नाशिक - त्र्यंबकेश्वर  येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेनिमित्त समाधीची शासकीय महापूजा  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने महापूजेनंतर पालकमंत्र्यांनी यात्रास्थळाची तसेच  देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत समाधान बोडके, तुकाराम भोये, संस्थांनचे अध्यक्ष नीलेश गाढवे, विश्वस्त कांचन देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Nashik: Mahapuja of Saint Nivrittinath's Samadhi by Guardian Minister Bhuse

टॅग्स :Nashikनाशिक