नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्यांदा गोडसे करणार प्रतिनिधीतत्व; २लाख १८ हजार मतांनी गोडसे यांची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:25 IST2019-05-23T19:25:35+5:302019-05-23T19:25:54+5:30
मतमोजणीच्या १८फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख १८ हजार ६१ मतांनी मागे टाकले आहे.

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्यांदा गोडसे करणार प्रतिनिधीतत्व; २लाख १८ हजार मतांनी गोडसे यांची मुसंडी
नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाºया नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या १८फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख १८ हजार ६१ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे गुलालाची उधळण सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये १८व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ४२ हजार ६१२ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख २४ हजार ५५१ मते पडली आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.