शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळ्यात, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:27 AM

भरवस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील ही घटना आहे.

ठळक मुद्देभरवस्तीत शिरला बिबट्याबिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमीबिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक : गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी (25जानेवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच घबराहट पसरली होती. नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी आणि आरडाओरड्यामुळे बिबट्या बिथरला आणि लोकांवर हल्ला करू लागला. त्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह दोन पत्रकार आणि शिवसेनेचा नगरसेवक जखमी झाला आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दोन तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

टोलेजंग बंगले, रो हाऊस, उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या सावरकर नगर, शंकर नगर, पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याचा थरार नागरिकांनी अनुभवला. शंकर नगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. तेथील मोकळ्या भुखंडातील गवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसला होता. बघ्यांच्या गर्दी आणि त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्या बिथरला आणि मग त्यानं बंगल्यांच्या दिशेने धाव घेतली. 

10 ते 15 फुटांच्या भींती बिबट्याने सहज भेदत बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घातला. बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने चार जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रथम वनरक्षक उत्तम पाटील जखमी झाले. त्यानंतर नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठीने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून मारवा बंगल्यात झेप घेतली. या बंगल्यात लपण्याची जागा शोधत असताना बिबट्याने चित्रिकरण करणा-या वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार तबरेज शेखवर हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर पत्रकार कपिल भास्कर यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला.  

पोलिसांच्या काठ्यांमुळे बिथरला बिबट्यावनविभागाचे रेस्क्यू पथक एअर गनच्या सहाय्याने ‘ट्रॅन्क्यूलाईज’ करण्यासाठी योग्य संधी आणि जागेच्या विचार करत होते. याचदरम्यान बिबट्या दिसताच क्षणी पोलीस कर्मचारी त्याच्यामागे लाठ्या-काठ्या घेऊन धावत जात होते. यामुळे बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाईज’ (बेशुद्ध) करताना अडचणी आल्या. वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी तीन वेळा इंजेक्शन सोडले असता दोन इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. मारवा बंगल्याच्या गेटवर लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या येऊन अडकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जखमी नागरिकांची नावे 1. संतोष गायकवाड, शिवसेना नगरसेवक2. कपिल भास्कर, पत्रकार  3. तबरेज शेख, वृत्तवाहिनीचे कॅमेरामन4. उत्तम पाटील, वन रक्षक

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक