नाशिकला पावसाने झोडपले; रेड अलर्ट

By दिनेश पाठक | Updated: June 19, 2025 15:34 IST2025-06-19T15:34:07+5:302025-06-19T15:34:28+5:30

Nashik Rain Alert: सराफ बाजारात पावसाने चार दिवसात दुसऱ्यांचा पाणी शिरले.  

Nashik lashed by rain; Red alert | नाशिकला पावसाने झोडपले; रेड अलर्ट

नाशिकला पावसाने झोडपले; रेड अलर्ट

नाशिक : शहरात गुरूवारी (दि.१९) पहाटे तीन वाजेपासून पावसाने जाेर पकडला. दुपारी अडीच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहर जलमय झाले.

हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पर्यटकांनी धोकादायक, प्रतिबंधक क्षेत्रात पाहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. गोकाकाठावरील दुतोंड्या माराेतीच्या कमरेपर्यंत पाणी आले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. पाताळेश्वर मंदिर पाण्याखाली आले. रामकुंडावरील धार्मिक विधी बंद करण्यात आले असून दुकानदारांना तेथून तातडीने अन्यत्र हलविण्यात आले.

सराफ बाजारात पावसाने चार दिवसात दुसऱ्यांचा पाणी शिरले.  नांदूरमध्यमेश्वर धरणातून (बंधारा) दुपारी २ वाजता ३२०० क्यूसेक इतका विसर्ग गोदावरीत सोडण्यात आल्याने नदीपात्राची पाण्याची पातळी वाढली. शहराप्रमाणेच जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

Web Title: Nashik lashed by rain; Red alert

टॅग्स :Rainपाऊस