शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: बिल्डर हेमंत पारख यांना सुरतजवळ सोडून अपहरणकर्ते फरार; नवसारी येथून आणले सुखरूप 

By अझहर शेख | Updated: September 3, 2023 16:00 IST

Nashik: ​​​​​​​नाशिक शहरातील गजरा बांधकाम समुहाचे चेअरमन हेमंत मदनलाल पारख (५१,रा.श्रद्धाविहार, इंदिरानगर) यांचे अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या निहिता नावाच्या बंगल्यासमोरून शनिवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती.

- अझहर शेखनाशिक -  शहरातील गजरा बांधकाम समुहाचे चेअरमन हेमंत मदनलाल पारख (५१,रा.श्रद्धाविहार, इंदिरानगर) यांचे अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या निहिता नावाच्या बंगल्यासमोरून शनिवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत त्यांच्या शोधात पथके रवाना केली होती. दरम्यान, रविवारी (दि.३) पहाटे पारख यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळविले आणि पोलिस व नातेवाईकांनी नवसारी गाठून पारख यांना सुखरूप ताब्यात घेत नाशिकमध्ये त्यांच्या राहत्या घरी आणले. दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या घरी भेट देत पारख यांची विचारपूस केली.

शहरातील इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील श्रद्धाविहार भागात मुख्य रस्त्यापासून काही मीटर आतमध्ये कॉलनीरोडला लागून निहिता नावाचा बंगला आहे. या बंगल्यात हेमंत पारख हे त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या बंगल्यासमोरून अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना मोटारीत बळजबरीने कोंबून पळ काढला होता. यानंतर घटनेची माहिती मिळताच रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले होते. शिंदे यांनी त्वरित पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त गुन्हे शाखेच्या तीनही युनिटचे अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या शोधार्थ वेगवेगळे पथके तयार करून त्वरित रवाना करण्याचे आदेश दिले होते. रात्रभर पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशेने अपहृत पारख यांचा शोध घेत होती.मात्र पोलिसांना कुठल्याही स्वरूपाचा सुगावा यावेळी लागू शकला नाही.

रविवारी पहाटे त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर स्वत: पारख यांनी संपर्क साधून ते कोठे आहे, याची माहितील दिली. यानंतर नातेवाईकांनी इंदिरानगर पोलिसांना कळविले व त्वरित पोलिस अणि नातेवाईक त्यांनी सांगितलेल्या सुरत जिल्ह्यातील नवसारी-वलसाडकडे रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी पारख यांनी सुरक्षितपणे सोबत घेत वाहनातून नाशिकला आणले. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यांचे बांधकाम व्यावसायिक भागीदार अक्षय धैर्यशील देशमुख (५१,रा.श्रद्धविहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी