शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 6:18 PM

नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते

ठळक मुद्देत्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच

नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू  राष्ट्रसंत  क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.

मुनिश्री तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते. त्यांच्या येण्याने संपुर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी चातुर्मासनिमित्ताने रविवार कारंजा चौकात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तरुणसागरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते, ‘मी कुठलीही धार्मिक कथा सांगायला आलो नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगायला आलो आहे’ समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सांगताना हरविलेल्या हास्यावर प्रकश टाकत ‘आज मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य असे गायब झाले आहे, जसे निवडणूकानंतर पुढारी गायब होतात’ असे सोदाहरण सांगितले होते. दरम्यान, डोंगरे वसतीगृह मैदानावर २१ दिवसीय प्रेरणा महोत्सव पार पडला होता. यावेळी तरुणसागरजी यांनी विविध विषयांवर २१ दिवस नाशिककरांना मार्गदर्शन केले होते. या महोत्सवात तरुणसागरजी यांनी दुखीतांचे अश्रू पुसणे हीच ईश्वरपूजा, साधु-संतांमधील सुसंवाद राष्टसाठी उपकारक, माता-महात्मा अन् परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ, मातृ-पितृ अतिथि देवोभव: ही भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर प्रवचनातून प्रकाश टाकल्याची माहिती राजेंद्र पहाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नाशिककरांच्या वतीने सन्मानगोदाकाठावर नाशिककरांच्या वतीने महापालिके कडून कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरुणसागरजी महाराज, प्रतिकसागरजी महाराज यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या क टु प्रवचनाने नाशिककरांची मने जींकली होती.-- 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरNashikनाशिक