नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.
नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:24 IST
नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते
नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास
ठळक मुद्देत्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच