शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Nashik: ढोल-ताशांच्या गजरात गोदाकाठ परिसर दुमदुमला, वीरांची मिरवणूक पाहण्यासाठी लोटली गर्दी

By suyog.joshi | Updated: March 25, 2024 21:19 IST

Nashik News: गळ्यात झेंडूची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण अन विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणूकीने सोमवारी गोदाकाठ परिसर दणाणला. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडीसह पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते.

-  सुयोग जोशी नाशिक - गळ्यात झेंडूची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण अन विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणूकीने सोमवारी गोदाकाठ परिसर दणाणला. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडीसह पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी रामकूंड परिसरात वीरांची मिरवणूक काढण्याची परंपरा असून, यंदाही ही मिरवणूक काढण्यात आली.  रामकुंडावर वाजतगाजत वीरांचे टाक आणून त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा टाक वाजतगाजत घरी नेण्यात आले. घरी गेल्या तळी आरती करण्यात आली. मिरवणुकीत कृष्ण, बाल छत्रपती शिवाजी, बाल हनुमान, शंकर, देवी, नवरदेव, मावळे, मल्हार अशा विविध वेशभूषा करत वीर सजले असल्याचे चित्र दिसून आले. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी धुलीवंदनाला वीर नाचविण्यात आले. कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचा चांदीचा, पितळी टाक बनवून ते टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेऊन त्या भोवती लाल कपडा गुंडाळला होता. असाही आनंद द्विगुणितएका बाजुला सोमवार असल्याने कपालेश्वर महादेवाची आरती सुरू होती, दुसरीकडे गोदा आरतीचे पावन सूर कानी येत असतांनाच विरांच्या मिरवणूकीने नाशिककरांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यासह शहराच्या विविध भागातून भाविकांनी गर्दी केली होती. रामकुंडाला यात्रेचे स्वरूपजुन्या नाशकातील बाशिंगे वीर, रविवार कारंजा येथील दाजिबा वीर आणि घनकर गल्लीतील येसोबा वीर यांची मिरवणूक प्रमुख आकर्षण ठरले. बाशिंगे विराची जुन्या नाशकातून दुपारी दोन वाजता वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी या विरांचे भाविकांनी विधिवत पूजन करून स्वागत केले. या विरांच्या मिरवणुकीने गोदाकाठ परिसराला यात्रेचा स्वरूप प्राप्त झाले होते. गोदेच्या चारही बाजूंकडून भाविकांचा लोंढा उशिरापर्यंत येत होता. त्यामुळे उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. ठिकठिकाणी वाहतुक ठप्पविरांच्या मिरवणुकीने रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, मेनरोड, भद्रकाली, साक्षी गणेश परिसरासह मेहर सिग्नलसह होळकर पूलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. रविवार कारंजावर तर वाहतुक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक