टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 16:14 IST2019-11-10T16:04:54+5:302019-11-10T16:14:25+5:30
५० व्या आंतरजिल्हा व ८१ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या संघानी उल्लेखनीय कामगिरी करत एक रजत व चार कांस्य पदके मिळविले तर वैयिक्तक स्पर्धेत एक रजत व चार कांस्य पदके पटकावले.

टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचा दबदबा
नाशिक : शिवछत्रपती क्र ीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ५० व्या आंतरजिल्हा व ८१ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या संघानी उल्लेखनीय कामगिरी करत एक रजत व चार कांस्य पदके मिळविले तर वैयिक्तक स्पर्धेत एक रजत व चार कांस्य पदके पटकावले.
सब जुनिअर मुलींच्या संघाला अंतिम फेरीत पुणे संघाकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत ३-२ ने पराभव स्वीकारत रजत पदकावर समाधान मानावे लागले. तर सब जुनिअर मुले, कॅडेट मुली, जुनिअर मुली, जुनिअर मुले व पुरु षांच्या संघाने उत्कृष्ट कामिगरी करत कांस्य पदक मिळविले. तसेच वैयिक्तक स्पर्धेत देखील सब जुनिअर मुलींच्या गटात तनिषा कोटेचाने अंतिम फेरी गाठत रजत पदक मिळविले. तसेच सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडा, सब जुनिअर मुलींच्या गटात सायली वाणी, कॅडेट मुलींच्या गटात अनन्या फडके व युथ मुलांमध्ये सौमीत देशपांडे यांनी कांस्य पदक मिळविले. या स्पर्धेत नाशिकने एकूण दोन रजत व नऊ कांस्य पदक मिळवत पूर्ण महाराष्टात पदकाच्या क्र मवारीत ठाणे, मुंबई उपनगर यांच्या पाठोपाठ तिसरे स्थान मिळविले. सर्व विजयी खेळाडूंना या प्रसंगी राज्य संघटनेतर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. यासाठी त्यांना जय मोडक व अजिंक्य शिंत्रे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.