‘चेतक फेस्ट’च्या सौंदर्य स्पर्धेत नाशिकचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:10 IST2019-01-07T17:07:12+5:302019-01-07T17:10:35+5:30

स्पर्धेचे परिक्षण जितेश निकम, स्वाती ठाकूर, नुतन मिस्त्री यांनी केले. यावेळी नाशिककर महिलांनी ‘रॅम्प वॉक’ करत दाखविलेली झलक लक्ष वेधून गेली.

Nashik dominates in 'Chetak Fest' beauty pageant | ‘चेतक फेस्ट’च्या सौंदर्य स्पर्धेत नाशिकचे वर्चस्व

‘चेतक फेस्ट’च्या सौंदर्य स्पर्धेत नाशिकचे वर्चस्व

ठळक मुद्देचेतक फेस्टीव्हल अंतीम टप्प्यात . टॉप-६मध्ये चार नाशिककर महिलांची निवडसीमा गरुड यांनी मिसेस सारंगीचा किताब पटकाविला

नाशिक : राज्य पर्यटन महामंडळ व सारंगखेडा चेतक फेस्टीव्हल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या नाशिककर सौंदर्यवती ठरल्या. येथील फॅशन डिझायनर सीमा गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस सारंगी’चा बहुमान मिळविला. तर नम्रता विभुते यांनी दुसरा क्रमांक पटकाविला.
नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात सुरू असलेला चेतक फेस्टीव्हल अंतीम टप्प्यात आला आहे. या फेस्टीव्हलअंतर्गत घेण्यात आलेल्या ‘सौंदर्य स्पर्धेत राज्यातील बहुतांश महिलांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिककर महिलांनी बाजी मारली. मिसेस सारंगीचा किताब सीमा गरुड यांनी पटकाविला. त्यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या नाशिकच्या नम्रता विभूते यांना ३१ हजार रुपयांचे रोख तर तृतीय क्रमांक राखणाऱ्या शीतल बांगर यांना २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. टॉप-६मध्ये चार नाशिककर महिलांची निवड झाली होती. त्यामध्ये तीन विजेत्या ठरल्या. स्पर्धेचे परिक्षण जितेश निकम, स्वाती ठाकूर, नुतन मिस्त्री यांनी केले. यावेळी नाशिककर महिलांनी ‘रॅम्प वॉक’ करत दाखविलेली झलक लक्ष वेधून गेली.
---

Web Title: Nashik dominates in 'Chetak Fest' beauty pageant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.