Nashik doctor Sanjay Shinde killed in accident | नाशिकमधील डॉ. संजय शिंदे यांचा अपघातात मृत्यू

नाशिकमधील डॉ. संजय शिंदे यांचा अपघातात मृत्यू

नाशिक : येथून मोखाडा येथे मोटारीने जात असताना त्रंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,कामटवाडा, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

कारचे टायर फुटल्याने चालक शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळले. अपघातमध्ये शिंदे यांना गंभीर मार लागला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन शिंदे यांना मोटारीतून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात येत असताना नाशिककडे जाणारी खाजगी वाहने थांबण्यास तयार नव्हती. सुदैवाने त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे  जाणारी 108 रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यानंतर नागरिकांनी अपघाताची माहिती दिली आणि रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी शिंदे यांच्यावर  तत्काळ प्रथम उपचार सुरू केले. तसेच, प्राणवायू सपोर्ट देऊन रुग्णवाहिका नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे रवाना झाली. मात्र, जिल्हा रुग्णालयात शिंदे यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत मयत घोषित केले. 

दरम्यान, या अपघातामध्ये आणखी 2 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावरही नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

Web Title:  Nashik doctor Sanjay Shinde killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.