नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 08:19 PM2019-10-07T20:19:40+5:302019-10-07T20:22:28+5:30

माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घेण्यासाठी

Nashik district withdraws 3 candidates on last day | नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार

नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार

Next
ठळक मुद्देपंधरा जागांसाठी १४८ रिंगणात : दुरंगी, बहुरंगी लढतीचे चित्रजिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या सोमवारी अंतिम दिवशी सर्वच मतदारसंघांमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडून अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने प्रमुख उमेदवारांमध्येच दुरंगी, तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले तर अनेकांना माघारीसाठी गळ घालूनही उपयोग न झाल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका दिवसात २१२ उमेदवारांपैकी ६४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे.


माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घेण्यासाठी राष्टÑवादी व कॉँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यांनी माघार घेतली नाही. पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे व सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली असली तरी, शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी माघार घेण्यास नकार देत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार सीमा हिरे यांच्यापुढे सेनेच्या बंडखोरीचे आव्हान कायम आहे. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर डॉ. दिलीप भामरे यांनी माघार घेतली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून मात्र एकही माघार होऊ शकली नाही. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. देवळाली मतदारसंघातून माजी नगरसेवक भाजपाचे कन्हैया साळवे, राष्टÑवादीचे नगरसेवक हरिष भडांगे यांनी माघार घेतली आहे. दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार नरहरी झिरवाळ व सेनेचे उमेदवार भास्कर गावित यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे असून, येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर माणिकराव शिंदे यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे छगन भुजबळ यांची लढत सेनेचे संभाजी पवार यांच्याशी होणार आहे. इगतपुरी मतदारसंघातून बाळा मेंगाळ याच्यासह तिघांनी माघार घेतली, मात्र शिवसेनेचे इच्छुक माजी आमदार शिवराम झोले यांच्या पत्नीची उमेदवारी कायम असल्याने इगतपुरी मतदारसंघात सेनेच्या उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. सिन्नर मतदारसंघातून सीमंतिनी कोकाटे यांनी माघार घेतल्यामुळे सिन्नरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात सरळ लढत होणार आहे. कळवण मतदारसंघातही माकपाचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार व सेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात तिरंगी लढत अटळ झाली आहे.
नांदगाव मतदारसंघातून भाजपाच्या जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, पंकज खताळ, सेनेचे माजी आमदार संजय पवार यांनी माघार घेतली असली तरी, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपाचे रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर भाजपाच्या बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Nashik district withdraws 3 candidates on last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.