नाशिक जिल्ह्यात १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:58 IST2019-06-11T17:58:15+5:302019-06-11T17:58:29+5:30
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार आहेत. मॉडेल स्कूल होण्यासाठी शाळांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार आहेत. मॉडेल स्कूल होण्यासाठी शाळांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुणे येथे झालेल्या शैक्षणिक सुविधा, समस्यांवर चर्चेप्रसंगी ते बोलत होते.
मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, विद्या सचिव बी. डी. गांगुर्डे, बी. के. आव्हाड, अनिल भोर, संजय कानवडे, भागवत उगले, आर. पी. बर्डे, सी. एल. शिंदे, सचिन कानवडे, टी. के. घुगे, प्रशांत पाटील, दीपक पाटील, संदीप वलवे यांच्यासह नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील पदाधिकारी उपस्थित होते. पाटील यांच्यासोबत विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली.
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा डिजीटल करण्यात याव्यात. त्यासाठी मुख्याध्यापक संघाने लक्ष केंद्रीत करून शिक्षण विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा डिजटल करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले. ज्ञान रचनावाद पध्द्तीचा अवलंब करणे, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाचा आराखडा तयार करणे हे आपले ध्येय असल्याचे पाटील यांनी सांगितले.