शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

नाशिक जिल्ह्यात ११ ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:23 IST

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत.

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. अशाच प्रकारच्या नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा व्यापाºयांवर ११ ठिंकाणी धाडी टाकण्यात आल्याचे समजते. देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. यावाबत अधिकाºयांशी विचारणा केली असता त्यांंनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. --------------कांद्याच्या चढ्या दराचा परिणामदेशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चढेच राहिल्यामुळे महानगरांमध्ये कांद्याचे प्रतिकिलो दर शंभर रु पयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात देशात १ लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमटीसी कंपनीला कांदा आयातीचे निर्देश दिले असून, त्या कांंद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपवली आहे. राज्यातील कांदा नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला असून, कांदा उत्पादकांनात मोठी तुट होण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीपैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि अभ्यासकांचे मत आहे. चांदवड, येवला, सिन्नर, निफाड तसेच कसमादे पट्टयातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांतील कांदा उत्पादनात देखील घट येणार आहे. अवकाळी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा साडेसतरा हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याची स्थिती निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे कांदा उत्पादक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले त्यात नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांनी तयार केलेली रोपे खराब झाली. शेतकºयांनी पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लागवडी केल्या. या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक