शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:03 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले.

ठळक मुद्देजलसंकट : मान्सून लांबणीच्या शक्यतेने धसका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्केच साठा शिल्लक राहिला असून, हवामान खात्याने मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत दिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलसंकट उभे ठाकले आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील जलसाठ्याचे पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले. मराठवाडा, नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहत, रेल्वे यांसह सिंचनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले. तथापि, यंदा धरणांमध्येच जेमतेम ७२ टक्के जलसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. अशातच फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊ लागले, त्यातच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडावे लागल्याने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी १० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही नऊ धरणे कोरडीठाक पडली आहेत.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सर्वाधिक म्हणजे २४ टक्के साठा असून, त्या खालोखाल चणकापूरमध्ये १९ टक्के, करंजवणला १७, पालखेडला १३, दारणा, गिरणा धरणात दहा टक्के साठा आहे. गंगापूर धरण समूहात १६ टक्के, पालखे ड समूहात १२ टक्के, दारणा समूहात ६ टक्के, गिरणा खोºयात १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक