कमी मुलींच्या संख्येत नाशिक जिल्हाही चिंंताजनक : डॉक्टरांसाठी गर्भधारणा निदान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:21 AM2018-03-04T01:21:26+5:302018-03-04T01:21:26+5:30

नाशिक : हजार मुलांमागे मुलींची संख्या ९७० इतकी असणे आवश्यक असतानाही नाशिक जिल्ह्यात हेच प्रमाण ९२७वर पोहोचले.

Nashik district is also worried about the low number of girls: pregnancy diagnosis workshop for doctors | कमी मुलींच्या संख्येत नाशिक जिल्हाही चिंंताजनक : डॉक्टरांसाठी गर्भधारणा निदान कार्यशाळा

कमी मुलींच्या संख्येत नाशिक जिल्हाही चिंंताजनक : डॉक्टरांसाठी गर्भधारणा निदान कार्यशाळा

Next
ठळक मुद्दे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे कायद्यावरील आयोजित कार्यशाळेत उघडरुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णालयासाठी निश्चित केलेले मापदंड पाळले जावे

नाशिक : हजार मुलांमागे मुलींची संख्या ९७० इतकी असणे आवश्यक असतानाही नाशिक जिल्ह्यात हेच प्रमाण ९२७वर पोहोचल्याने देशभरात मुलींची संख्या कमी असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश झाल्याची चिंताजनक बाब शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे कायद्यावरील आयोजित कार्यशाळेत उघडकीस आली. त्यामुळे मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यशाळेत सहभागी सर्वच मान्यवरांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत राज्य समन्वयक डॉ. आसाराम खाडे, डॉ. अनुजा गुलाटी, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अ‍ॅड. उदय वाळुंजीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. खाडे म्हणाले, लिंग गुणोत्तर प्रमाण चांगले रहावे यासाठी केलेला कायदा हा समजण्यासाठी अवघड आहे, असा गैरसमज वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. परंतु चुकीच्या घटनांना रोखण्यासाठी यातील महत्त्वाच्या चार स्तंभांना समजून घेतल्यास प्रक्रिया सहज वाटेल. यासाठी शासनाने इंग्रजी बरोबरच मराठीमध्येदेखील या कायद्याचे भाषांतर केले आहे. या कायद्याला अभिप्रेत असलेले रुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णालयासाठी निश्चित केलेले मापदंड पाळले जावे व सद्यस्थितीत कायद्यातील तरतुदीचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. डॉ. लोचना घोडके म्हणाल्या, वैद्यकीय व्यवसायातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मागील वर्षी धडक मोहीम राबविली. दोषी आढळलेल्यांवर कारवाई सुरू केली पण मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या कार्यशाळांमधून मत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनातील तज्ज्ञांनी यावर संवेदनशील होऊन विचार करावा. तर डॉ. सुरेश जगदाळे यांनी जिल्ह्णातील ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण कमी झाले असून, हा चिंतेचा विषय आहे. हे प्रमाण हजार मुलांमागे ९७० मुली होण्याची आवश्यकता आहे. देशातील कमी प्रमाण असलेल्या शंभर जिल्ह्णांमध्ये नाशिकचा सामवेश झाल्याचे ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. वाळुंजीकर, प्रमोद पवार यांनीही मार्गदर्शन केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी भंडारी यांनी आभार मानले. या कार्यशाळेस शहर व जिल्ह्णातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक हजर होते.

Web Title: Nashik district is also worried about the low number of girls: pregnancy diagnosis workshop for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.