राज्यातील एकूण उत्पादनापेकी 50 टक्के उत्पादना एकटया नाशिक जिल्'ात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:28 IST2020-09-18T23:14:30+5:302020-09-19T01:28:17+5:30

नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे.

Nashik district alone accounts for 50% of the total production in the state | राज्यातील एकूण उत्पादनापेकी 50 टक्के उत्पादना एकटया नाशिक जिल्'ात

राज्यातील एकूण उत्पादनापेकी 50 टक्के उत्पादना एकटया नाशिक जिल्'ात

ठळक मुद्देहंगामात जिल्'ात 1 लाख 71 हजार 390 हेक्टर क्षेत्रवार कांदा लागवड

नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे.
सन 2019-20 च्या रब्बी आणि उन्हाली हंगामात जिल्'ात 1 लाख 71 हजार 390 हेक्टर क्षेत्रवार कांदा लागवड करण्यात आली होती.जिल्'ात एकूण 58,527 कांदा चाळी असून त्यात 12.25 लाख में.टन कांदा सठवला जातो. याशिवाय 10 ते 11 लाख टन कांदा शेतकरी आपापल्या परिने सठवतात. जिल्'ात 15 सेप्टेंबर अखेर 19.50 लाख में.टन कांदा विक्री जाली आहे.तर 9.92 लाख में.टन कांदा अद्याप शिल्लक असल्याचा अंदाज वर्तिविला जात आहे. शिल्लक असलेला कांडा सडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फ़टका बसनयाची शक्यता वर्तिवली जात आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशात मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान,कर्नाटक या राज्यामधे झालेली कांदा लागवड तेथील नैसर्गिक आपत्ति याच्यावर पुढील काळात कांदा दरतिल चढ उतार अवलंबून आहेत. लाल कांद्याची लागवड झालेली असली तरी बºयाच प्रमाणात नुकसान झाले आहे पाऊस थांबला नाही तर त्यात अणखी नुकसान होण्याची शक्यता आहे .

जिल्'ाची सरासरी उत्पादकता 22.93 टन प्रति हे रब्बी,उनहाली कांदा उत्पादन 39.61 लाख में.टन जिल्'ातील अनुदानित कांदा चाळी 26,398 साठवन क्षमता 5. 65 लाख में.टन खासगी कांदा चाळी 32129 साठवन क्षमता 6.60 लाख में.टन.

 

Web Title: Nashik district alone accounts for 50% of the total production in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.