शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

By admin | Updated: January 11, 2017 22:47 IST

सातत्याने घसरण : नाशिककर गारठले; पारा ५.८ अंशावर

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी (दि. ११) सकाळी किमान तपमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला.  जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पारा ५ अंशावर आला आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तपमानात घसरण होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारी ६.५ अंशावर शहराचे किमान तपमान होते. बुधवारी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत हवेमध्ये गारठा जाणवत होता, त्यामुळे नोकरदार व श्रमिक नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले होते. अहमदनगरचे किमान तपमान ७.१, मालेगाव ७.४, पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असा प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.
नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५ डिसेंबरला हंगामातील ५.४ अंश इतक्या नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६ मध्ये २२ जानेवारीला ५.५ नीचांकी तपमान नोंदविले गेले होते.
आठवडाभरापासून सातत्याने नाशिकच्या थंडीमध्ये वाढ होत असून, नाशिककर गारठले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडला सध्या पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे. यामुळे शेतीकामांवरही परिणाम झाला असून, गहू पिकासाठी थंडी पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक मात्र धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)