शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नाशिक  शहरात नऊ महिन्यांत सव्वा कोटींची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:07 IST

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़

नाशिक : शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़ यामध्ये दीड किलो दागिन्यांचा समावेश असून, या चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी शहर पोलिसांनी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवला आहे़ दरम्यान, गत नऊ महिन्यांमध्ये चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लुटमारीचे १५९ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ८४ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे़ आतापर्यंत पोलिसांनी दोन वेळा नागरिकांना मुद्देमाल परत केला असून, लवकरच गुन्हेगारांकडून जप्त केलेला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल परत केला जाणार आहे़  शहरात दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत खेचून नेणे, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत मोबाइल, रोख रक्कम, वाहने घेऊन गुन्हेगार फरार झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. याप्रकरणी शहरातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विविध घटनांमध्ये गुन्हेगारांनी एक कोटी २५ लाख आठ हजार ४७८ रुपयांची लूट केली आहे. पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांचा लुटीचा आकडा असला तरी बाजारभावानुसार या लुटीतील वस्तूंची किंमत कितीतरी अधिक आहे़  पोलिसांनी सप्टेंबरअखेरपर्यंत १५९ पैकी ८४ गुन्हे उघडकीस आणले असून १६२ गुन्हेगारांना गजाआड केले आहे़ पोलिसांनी पकडलेल्या या संशयितांकडून ४२ लाख २४ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे़चोरट्यांकडून दीड किलो सोन्याची लूटशहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांमध्ये चेनस्नॅचिंगचे ५५ गुन्हे दाखल असून, त्यात ८८ संशयितांचा सहभाग आहे. दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून या संशयितांनी महिलांकडील १५८.३५ तोळे म्हणजेच सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी खेचून नेले आहे़ पोलिसांनी सहा गुन्हे उघडकीस आणले असून, ६६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत़चोरीचा माल खरेदी करणाºयांवर गुन्हेगुन्हेगारांना अटक केल्यानंतर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात़ मात्र, चोरट्यांचे खरेदीदार हे ठरलेले असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे़ त्यामुळे चोरीचा माल असल्याचे आम्हाला माहीत नव्हते, असा बचाव खरेदी करणाºयांना करता येणार नाही़ तसेच चोरीचा माल खरेदी करणाºयांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत़

टॅग्स :GoldसोनंPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी