Nashik: नाशिक मनपातील सीटी लिंकचे वाहक अचानक संपावर, शहर बस वाहतूक विस्कळीत

By संजय पाठक | Updated: December 2, 2022 12:59 IST2022-12-02T12:58:40+5:302022-12-02T12:59:38+5:30

Nashik News: महापालिकेच्या सीटी लिंक बस सेवेतील 41 वाहकांनी विविध मागणीसाठी काम बंद आंदोलन केल्यामुळे शहर बस वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

Nashik: City bus transport disrupted as CT link carriers in Nashik municipality suddenly go on strike | Nashik: नाशिक मनपातील सीटी लिंकचे वाहक अचानक संपावर, शहर बस वाहतूक विस्कळीत

Nashik: नाशिक मनपातील सीटी लिंकचे वाहक अचानक संपावर, शहर बस वाहतूक विस्कळीत

- संजय पाठक
नाशिक - महापालिकेच्या सीटी लिंक बस सेवेतील 41 वाहकांनी विविध मागणीसाठी काम बंद आंदोलन केल्यामुळे शहर बस वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

आज सकाळी पंचवटीतील तपोवन स्थानकातील या वाहकांनी बोनस तसेच प्रलंबित वेतन या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं त्यामुळे 21 बसेस रद्द कराव्या लागल्या. दरम्यान या डेपोतील अन्य बसेस तसेच नाशिक रोड बस स्थानकातून सिटीलिंकची सेवा व्यवस्थित सुरू आहे महापालिकडून ठेकेदाराला आवश्यक ते वेतन दिले जाते मात्र कर्मचाऱ्यांचा पीएफ, ईएसआय आणि अन्य देणे शासन दरबारी जमा केल्याच्या पावत्या न  मिळाल्यामुळे त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रलंबित आहे असे सिटीलींकचे उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितलं.

Web Title: Nashik: City bus transport disrupted as CT link carriers in Nashik municipality suddenly go on strike

टॅग्स :Nashikनाशिक