नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, अंबड व गंगापूर परिसरातून प्रत्येकी एक अशा दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अंबड परिसरातील दत्तनगर भागात नीलकंठ अपार्टमेंटमधील राहणार गजेंदर समशेरसिंग यांची दुचाकी क्रमांक एमएच १५ एफएच १२०३ इमातरतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार उघडे या प्रकारणाचा तपास करीत आहेत. दुसरी घटना अंबडलिंकरोड परिसरात घडली. या भागातील योगेश रामचंद्र सोनवणे यांची दुचाकी क्रमांक एमएच १५, डीव्ही २२८१ गंगापूररोवरील बालाजी मंदिराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार भूमकर अधिक तपास करीत आहेत.
नाशिकमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:49 IST
नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, अंबड व गंगापूर परिसरातून प्रत्येकी एक अशा दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
ठळक मुद्देनाशिकमधून दोन दुचाकींची चोरीगंगापूर , अंबड परिसरात लांबविल्या दुचाकी