नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

By संजय पाठक | Updated: June 17, 2025 10:13 IST2025-06-17T10:12:38+5:302025-06-17T10:13:42+5:30

Nashik News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात आयारामांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह सुमारे 14 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

Nashik BJP's entry ceremony today! Former minister Babanrao Gholap, Shiv Sena UBT's Sudhakar Badgujar and ten to twelve former corporators will Join BJP | नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

- संजय पाठक
नाशिक- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात आयारामांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह सुमारे 14 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत 
मुंबईतील भाजपा कार्यालयात दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रवेश सोहळा होणार असून त्यासाठी सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक खास बस आणि मोटारी करून मुंबईकडे रवाना झाले आहे.

राज्यात प्रथम सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये बबनराव घोलप हे समाज कल्याण मंत्री होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना अद्याप त्यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही तर सुधाकर बडगुजर यांच्यावर अलीकडेच भाजपा चे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याचा तसेच महापालिकेत ठेकेदारी करत असल्याचा आरोप केला होता.

विशेष म्हणजे बडगुजर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांना आव्हान दिले होते त्यावेळी याच आरोपांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजप आमदार सीमा हिरे यांनी प्रयत्न केले असतानाही त्यांना डावलून हा प्रवेश सोहळा होत आहे.

बडगुजर आणि घोलप यांच्याबरोबर माझी महापौर अशोक मूर्तडक, मनसेचे माजी शहर प्रमुख दिलीप दातीर, माजी नगरसेवक अशोक सातभाई, हर्षा बडगुजर, वंदना बिरारी यांच्यासह अन्य माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.

Web Title: Nashik BJP's entry ceremony today! Former minister Babanrao Gholap, Shiv Sena UBT's Sudhakar Badgujar and ten to twelve former corporators will Join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.