Nashik: कारवाडी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाड पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 22:16 IST2023-04-11T22:16:15+5:302023-04-11T22:16:24+5:30
Nashik: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली.

Nashik: कारवाडी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाड पेटले
सिन्नर (नाशिक) : तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. रिमझिम पाऊसही झाला. यावेळी विजांच्या कडकडाट होऊन एक वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर पडली. त्यानंतर नारळाच्या झाडाने पेट घेतला. आग भडकल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू लागल्या. जाधव यांची वाहने येथे असतात, व लहान मुले अंगणात खेळत असतात. मात्र सुदैवाने त्यावेळी येथे वाहने उभी नव्हती. ब्लोअर मशीनच्या साह्याने आग विझवण्यात आली. दरम्यान, या नारळाच्या झाडाला लागलेला आजचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली #Nashikpic.twitter.com/ZPbplkp5hY
— Lokmat (@lokmat) April 11, 2023