नाशिक @७.६,नाशिककर गारठले : सातत्याने किमान तपमानात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:04 IST2017-12-29T14:02:09+5:302017-12-29T14:04:42+5:30
सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली

नाशिक @७.६,नाशिककर गारठले : सातत्याने किमान तपमानात घसरण
नाशिक : शहराचा किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीची लाट शहरासह जिल्ह्यात कायम आहे. गेल्या सहा दिवसांपासून तपमान दहा अंशांच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककर गारठले आहे. शुक्रवारी (दि.२९) शहराचे किमान तपमान ७.६ इतके नोंदविले गेले.
गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी थंडीची तीव्रता आणखीच वाढलेली दिसून आली. किमान तपमानाचा पारा काही अंशी खाली सरकल्याने हवेतील गारव्यात वाढ पहायला मिळाली. गेल्या सहा दिवसांपासून किमान तपमानाचा पारा सातत्याने घसरू लागला आहे. यामुळे थंडीची तीव्रता शहरात वाढली आहे.
७.६ इतके तपमान शुक्रवारी नोंदविले गेल्याने हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद झाली होती. थंडीचा कडाका वाढू लागल्याने रात्री ८ वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकूणच विदर्भानंतर उत्तर महाराष्टÑात नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे. सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली राहत असून, शहरात थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिककर गारठले आहेत. हंगामात ७.६ हे सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. एकूणच उत्तर भारतात आलेल शीतललहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर, चहा, सुप सारख्या गरम पदार्थांच्या सेवनावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेक ोट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये होत होती. किमान तापमानाचा पारा ९ अंशांच्या जवळपास राहत असल्यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.