नाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द
By Admin | Updated: February 6, 2017 15:21 IST2017-02-06T15:21:05+5:302017-02-06T15:21:16+5:30
शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले एबी फॉर्म रद्द करण्यात आले आहेत.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले एबी फॉर्म रद्द करण्यात आले आहेत. काही किरकोळ चुकांमुळे फॉर्म रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणूक आयोग भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 4, 30 आणि 29 मध्ये हा गोंधळ झाला असून यावरुन आता शिवसेना- भाजपा आमने सामने आले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. यावेळी नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणारच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.