नासर्डीने पात्र ओलांडले ; शिवाजीवाडीतील शंभर जण स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:15 PM2019-08-04T15:15:34+5:302019-08-04T15:20:26+5:30

नाशिक शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

Nasardi crossed the line; Hundreds of Shivajiwadi migrated | नासर्डीने पात्र ओलांडले ; शिवाजीवाडीतील शंभर जण स्थलांतरीत

नासर्डीने पात्र ओलांडले ; शिवाजीवाडीतील शंभर जण स्थलांतरीत

googlenewsNext
ठळक मुद्दे नासार्डीने ओलांडली धोक्याची पातळीपात्र ओलांडल्याने नदीकाठच्या वस्त्यांना धोकाशिवाजीवाडीतील शंबर जणांना सुरक्षीत ठिकाणी हलवले

नाशिक : शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 
शहरातील पावसाचा जोर वाढल्याने रविवारी (दि.४)  दुपारी बारा वाजेच्या सुमारास नासर्डी नदीच्या पुराचे पाणी नदीपात्राबाहेर पडल्याने  नदीकाठी असलेल्या शिवाजीवाडी परिसरात असलेल्या घरांमध्ये व झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांनी आपले संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाचेही पूर परिस्थितीवर लक्ष असल्याने विभागातील अधिकाºयांनी तत्काळ  या भागातील रहिवास्यांना सुरक्षीच ठिकाणी हलविण्याची कायवाई केली. शिवाजीवाडी परिसराती सुमारे १०० जणांना त्यांच्या साहित्यासह सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यातील काही जणांना महापालिकेच्या उर्दू शाळेत हलविण्यात आले असून काही नागरिकांना श्रीरामनगर येथील सभागृह व  समाजमदींरा अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. या प्रभागातील नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, राजू मोरे यांच्यासह प्रभागातील अधिकाºयांनी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरातील सामानासह सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरित केले

 

Web Title: Nasardi crossed the line; Hundreds of Shivajiwadi migrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.