शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

नंदिनी नदीचा काठ झाला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:59 IST

प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाची महापालिकेने दखल घेतली आणि काही प्रमाणात स्वच्छता केली खरी; परंतु ती केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांनीदेखील हातभार लावायला हवा, या भावनाने रविवारी शेकडो हात सरसावले आणि अवघ्या काही तासांत नंदिनी नदीचा काठ स्वच्छ झाला. पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी तिडके कॉलनीतील मिलिंदनगर परिसरात ही मोहीम राबविली.

सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाची महापालिकेने दखल घेतली आणि काही प्रमाणात स्वच्छता केली खरी; परंतु ती केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरि-कांनीदेखील हातभार लावायला हवा, या भावनाने रविवारी शेकडो हात सरसावले आणि अवघ्या काही तासांत नंदिनी नदीचा काठ स्वच्छ झाला. पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी तिडके कॉलनीतील मिलिंदनगर परिसरात ही मोहीम राबविली.  मिलिंदनगर झोपडपट्टी भाग हा या नदीच्या काठावर असून, नाल्यामध्ये टाकण्यात येत असलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नाशिक शहरातील नासर्डी म्हणजेच नंदिनी नदीची स्वच्छता करण्यात यावी यासाठी पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी गेल्या महिन्यात उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण केले होते. त्यानंतर महापालिकेने दिलेल्या आश्वासनानुसार काही प्रमाणात नदीपात्र स्वच्छ केले. परंतु त्याचबरोबर नागरिकांनीदेखील यात सहभागी व्हावे यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. नंदिनीच्या काठालगत असलेल्या सिटी सेंटर मॉलपासून ते मुंबई नाक्यापर्यंत दाट लोकवस्ती आहे. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा टाकला जात असून, त्यामध्ये घाण, वाळू तसेच खराब झालेल्या टाकाऊ वस्तू टाकण्यात येतात. याबरोबरच नाल्यामध्ये काही कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणीदेखील सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  त्यापार्श्वभूमीवर सकाळी सुमारे तीन तास सदर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडीत तसेच बाजीराव तिडके, माजी नगरसेवक अण्णा पाटील, मुख्याध्यापक सुनील बिरारी, मनोज वाघचौरे, सतीश कोकाटे, संजय सोनार, पर्यवेक्षक अनिल माळी, बी. के. दातीर, एस. डी. खर्डे, शोभा पाटील, दीपिका पाटील, किरण मराठे, कल्पना गुंजाळ, निसर्ग मित्र संस्थेचे सुनील मेतकर, दर्शन पाटील, रोहन जगताप आदींसह महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे व मनपा कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले होते.विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभागया उपक्रमामध्ये धन्वंतरी होमिओपॅथिक कॉलेज, सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, मराठा हायस्कूल, ग्लोबल व्हिजन हायस्कूल, जी. डी. सावंत महाविद्यालय, जे. डी. बिटको महाविद्यालय, एसएमआरके कॉलेज, नाशिकरोड मराठा हायस्कूल, नमामि गोदा संस्था आदींचे मिळून पाचशेहून अधिक विद्यार्थी तसेच प्राचार्य, शिक्षक आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :riverनदी