शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव भूमिअभिलेखचा अधिकारी एसीबीच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 23:17 IST

नांदगाव : बिनशेती मोजणी प्रकार व नकाशा मिळवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विलास पांडुरंग दाणी ...

ठळक मुद्दे४० हजारांची लाच घेणारा उपअधीक्षक विलास दाणी ताब्यात

नांदगाव : बिनशेती मोजणी प्रकार व नकाशा मिळवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विलास पांडुरंग दाणी या अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईनंतर लाचखोर अधिकारी दाणी यांची कार्यपद्धती व भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शिवारातील शेतजमिनीचे बिनशेती मोजणी करून व त्याचा नकाशा मिळावा, यासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी प्रकरण जमा केले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी वारंवार भूमिअभिलेख कार्यालयात चकरा मारून प्रकरणाची चौकशी करीत होते.मात्र या बिनशेती मोजणी व नकाशा मिळविण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क करत भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुन्या तहसील कार्यालयातील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकरवी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांना पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर भूषण शेटे, महेश मोरे, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदी सहभागी होते. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी