वेळुंजेच्या सरपंचपदी नानासाहेब उघडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 14:46 IST2019-06-18T14:46:11+5:302019-06-18T14:46:24+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्या वेळुंजे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नानासाहेब (गौतम ) उघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वेळुंजेच्या सरपंचपदी नानासाहेब उघडे बिनविरोध
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्या वेळुंजे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नानासाहेब (गौतम ) उघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच गोपाळा उघडे यांचे ठरल्या प्रमाणे अडीच वर्ष पूर्ण झाल्याने सरपंच पद रिकामे होते. यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके यांच्या नेतृत्वाखाली खाली गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. याही वेळी सर्व सामान्य घरातील गरिबाच्या मुलाला सरपंच करत तालुक्यात एक नवा आदर्श घालून दिला आहे. सरपंचपदासाठी नानासाहेब उघडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी केली. यावेळी उघडे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चंदर हागोटे, नारायण हागोटे, विष्णू उघडे समाधान काशिद,सनु भुरबूडे, पप्पु काशिद, बाळु उघडे पिना उघडे, काळु उघडे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.