नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:43 PM2020-10-26T18:43:14+5:302020-10-26T18:43:47+5:30

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहे

Nampur Bazar Samiti's onion auction closed | नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद

नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद

Next
ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहे
व्यापारी वर्गाने विनंती अर्ज करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे आज नामपूर बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पद्धधिकारी वर्गाने निवेदन देऊन तात्काळ बाजार समितीत कांदा लिलाव चालू करण्याचे आव्हान बाजार समितीला केले आहे तसेच व्यापारी वर्गाने 25 टनाची अट आहे ही भीती मनातून काडून टाकत बाजार समितीत कांदा खरेदी करावा आणि जर कोणी अडचण आणली तर शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाच्या पाठीमागे भक्कम उभे राहतील असे देखील आव्हान केले आहे

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार ,शेखर कापडणीस ,डीगम्बर धोंडगे ,हर्षल अहिरे ,सुभाष शिंदे ,नीरज जगताप,भाऊसाहेब पगार ,तुषार कापडणीस,प्रवीण अहिरे,शेशी कोर सह्या आहेत

प्रतिक्रिया

कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण अतिशय क्लेश दायक आहे ,परदेशी आयात कांदा आयातदार किती ही साठा करू शेकतो परंतु भारतातील कांदा व्यापारी आपल्या जवळ 25 टनाच्या वरती ठेऊ शेकत नाही ही दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची अतिशय दुर्देवी आहे,ज्या भागात कांदा पिकतो आणि ज्या बाजार समितीत शेतकरी कांदा विक्रीस आणतो तेथील व्यापारी वर्गाला साठा मर्यादीची अट शिथिल केली पाहिजे ,कारण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करतो आणि व्यापारी तो कांदा लेगच ग्राहकांना पाठवू शेकत नाही कमीत कांदा प्याकिंग ला तरी वेळ दिला पाहिजे.
-अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष,
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
 
Web Title: Nampur Bazar Samiti's onion auction closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.