शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यापासून नायगाव तलाठी कार्यालय ‘सील’

By admin | Updated: November 12, 2016 22:56 IST

महिन्यापासून नायगाव तलाठी कार्यालय ‘सील’

 नायगाव : अतिरिक्त कार्यभार नाकारण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतल्यामुळे नायगाव येथील तलाठी कार्यालय महिनाभरापासून ‘सील’ करण्यात आले आहे. तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे नायगाव सजात समाविष्ट असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची ‘सजा’ भोगावी लागत आहे.नायगावसह जोगलटेंभी, सोनगिरी, ब्राह्मणवाडे या गावांचा नायगाव सजात समावेश होतो. त्यामुळे शेतजमिनीसंदर्भातील कामांसाठी या चारही गावांतील शेतकऱ्यांची येथील तलाठी कार्यालयात नियमित वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ तलाठ्याची नेमणूक न करता अतिरिक्त कार्यभार म्हणून नायगावची जबाबदारी इतर सजातील तलाठ्यांवर सोपविण्यात येत असल्यामुळे व वारंवार तलाठ्यांच्या बदल्या होत असल्याने आधीच शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात बारागावपिंप्री व वडांगळी या दोन सजांमधील सहा गावांचा कारभार असलेल्या एस. पी. गोराणे यांच्याकडे नायगाव सजातील चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील तीन सजातील दहा गावांचा कारभार सांभाळताना गोराणे यांची चांगलीच दमछाक होत होती. शिवाय पंधरा-वीस दिवसांनंतर एकेका सजातील तलाठी कार्यालया उघडले जात होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात कामे खोळंबून राहत होत असल्याने तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत होते.दरम्यान, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने अतिरिक्त पदभार असलेल्या सजांचा कार्यभार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलाठी गोराणे यांनी गेल्या महिन्यातच नायगाव तलाठी कार्यालय सील करुन त्याची चावी तहसील कार्यालयात जमा केली आहे. त्यामुळे महिनाभरापासून नायगाव सजातील शेतकऱ्यांची कामे अडून पडली असल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)