नगरसूल केंद्र शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:17 IST2020-08-18T16:16:58+5:302020-08-18T16:17:39+5:30
नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते.

नगरसूल केंद्र शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नगरसुल : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इंडियन आॅइल कॉर्पोरेशनचे सहाय्यक प्रबंधक पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश जाधव, म्हणून सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल, कदम, उद्धव निकम उपस्थित होते.
यावेळी इंडियन आॅइल कंपनीकडून सीएसआर अंतर्गत २४ लाख रु पये निधीतून शाळेस संरक्षण भिंत, बैठक हॉल, वॉटर फिल्टर, एलईडी टीव्ही या उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक संतोष मुंढे यांनी केले. कार्यक्र मास माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, डॉ. स्वप्निल जगताप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बोरसे आदींसह पोलीस कर्मचारी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.