भोंदूबाबा खरात महिलांना नेमके कोणते द्यायचा औषध?; गूढ कायम, पोलिस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 06:26 IST2026-03-30T06:26:35+5:302026-03-30T06:26:59+5:30

चाकणकर, शिवनिका ट्रस्टला समन्स दिल्याची रंगली चर्चा

Mystery Deepens Over Fake Godman Ashok Kharat Secret Medicine Police Custody Extended | भोंदूबाबा खरात महिलांना नेमके कोणते द्यायचा औषध?; गूढ कायम, पोलिस कोठडीत वाढ

भोंदूबाबा खरात महिलांना नेमके कोणते द्यायचा औषध?; गूढ कायम, पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : भोंदू अशोक खरात महिलांना कोणते औषध पाजायचा याबद्दलचे गूढ कायम असून, त्याच्या तपासासाठी न्यायालयाने पोलिस कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावल्याचे समजते. खरातशी संबंधित शिवनिका ट्रस्टच्या अन्य सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा होती.

विरोधकांनी चाकणकर व खरात यांचे काही फोटो माध्यमांसमोर आणले होते. त्यामुळे चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला आघाडीच्या जबाबदारीचा राजीनामा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची चर्चा आहे.

खरात तपासात सहकार्य करीत नाही 

रविवारी खरात याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी भोंदू खरात तपासात सहकार्य करीत नाही तसेच त्याने दिलेले द्रव (औषध) प्यायल्यावर किंवा पेढा खाल्ल्यावर पीडित महिला भोंदूबाबा जे बोलेल त्याप्रमाणे त्याच्या इशाऱ्यावर चालत होत्या व नंतर भोंदू खरात पीडितेवर अत्याचार करीत होता, तो पाण्यात गुंगी आणणारे कोणते खारट व कडवट औषध मिसळत होता किंवा कोणता पेढा खाऊ घालत होता याचा तपास बाकी आहे. त्यामुळे त्याची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली. त्यानंतर न्या. एम. व्ही. बराडे यांनी खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कशासाठी मागितली गेली कोठडी ? 

महिलांवर लैंगिक अत्याचारप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलिस कोठडीत आणखी ३ दिवस वाढ करण्यात आल्याने आता तो १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीतच राहील. खरात पीडित महिलांना नेमके कोणते द्रव पाजत होता, त्यात काय मिसळत होता याचा तपास बाकी आहे. तसेच खरात याच्या मोबाइल क्लोनिंगनंतर प्राप्त झालेल्या फोरेन्सिक अहवालाबाबत त्याच्याकडून स्पष्टता घेणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी तपास यंत्रणेने केली होती.

सध्या या प्रकरणात कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा अधिकाऱ्याची औपचारिक चौकशी करण्यात आलेली नाही. मात्र, तपासाच्या गरजेनुसार पुढील टप्प्यात कोणालाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. त्याबाबत वरिष्ठांकडून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. किरणकुमार सूर्यवंशी, तपास अधिकारी, एसआयटी.
 

Web Title : फर्जी गुरु की रहस्यमय दवा: जांच जारी, हिरासत बढ़ी

Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात द्वारा महिलाओं को दी गई दवा का रहस्य बरकरार है। उसकी पुलिस हिरासत 1 अप्रैल तक बढ़ा दी गई है। रूपाली चाकणकर को पूछताछ के लिए बुलाया गया। खरात असहयोगी है, पीड़ितों को नियंत्रित करने के लिए इस्तेमाल किए गए पदार्थ की जांच में बाधा डाल रहा है।

Web Title : Fake Guru's Mystery Drug: Investigation Continues, Custody Extended

Web Summary : The mystery of what drug the fake guru Ashok Kharat administered to women continues. His police custody is extended until April 1st. Rupali Chakankar summoned for questioning. Kharat is uncooperative, hindering the investigation into the substance used to control victims.