अंबासन फाट्याजवळ अपघातात माय-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:15 IST2019-03-08T00:04:31+5:302019-03-08T00:15:05+5:30
नामपूर : नामपूर- मालेगाव रस्त्यावर अंबासन फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेने माय-लेक ठार , तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली. जखमींना मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

अंबासन फाट्याजवळ अपघातात माय-लेक ठार
नामपूर : नामपूर- मालेगाव रस्त्यावर अंबासन फाट्यावर अज्ञात ट्रकच्या धडकेने माय-लेक ठार , तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली. जखमींना मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. नामपूर येथील समीर शब्बीर शेख हे कुटुंबांसह दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. यात समीर शेख व मुलगी झोया हे जखमी झाले. अपघााताच्या या घटनेत शेख यांची पत्नी सुरय्या शेख (२९) तसेच मुलगा आवेश (१०) हे जागीच ठार झाले.प्रचंड धुळीचे कारण?
नामपूर मालेगाव रस्त्यांच्या रु ंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. काम सुरू असताना ठेकेदाराने सुरक्षितता म्हणून फलक लावणे गरजेचे आहे. मात्र कोणतीही दक्षता नसताना हे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. मजूर रस्त्यावर माती टाकत होते. प्रचंड धुळीमुळे काही दिसत नव्हते. ट्रकवाल्यास समोरचे काही न दिसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.