MV Bokhare awarded lifetime honors | एम.व्ही.बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
डीएसटीए तर्फे जीवनगौरव पुरस्कार स्वीकारतांना एम. व्ही. बोखारे सह परिवार.

ठळक मुद्दे ऊस शेती व्यवसायामध्ये गेली ५५ वर्ष सातत्याने काम

कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.
डीएसटीए हि ८५ वर्षांपूर्वी वालचंद दोशी यांनी स्थापन केलेली संस्था असून साखर उद्योगासाठी शास्त्रज्ञांची नामांकित संस्था आहे. संस्थेने यावर्षी कसमादे पट्टा परिसरातील सुपरिचित मछिंद्र बोखारे यांनी ऊस शेती व्यवसायामध्ये गेली ५५ वर्ष सातत्याने काम केल्याबद्दल सेवा निवृत्त झाल्यांनंतरही शेतकऱ्यांशी नाळ जोडून त्यांच्यासाठी १५ वर्षांपासून डीएसटीए संस्थेमार्फत विनामल्य काम करत असल्याबद्दल त्यांना पुणे येथे ७०० शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत साखर परिषदेमध्ये विशेष सन्मानाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साखर उद्योगात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना समाजश्री हा पुरस्कारही मिळाला आहे. साखर कारखान्यात उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक असल्याने वेगवेगळ्या साखर कारखान्यांनी २१ वेळा त्यांचा सेवाकाळात गौरव केला आहे. त्यांनी एकरी शंभर मॅट्रिक टन ऊस उत्पादन वाढीसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी व कारखानदारीसाठी पुस्तके लिहिली आहेत.
यावेळी माजी आमदार शांताराम आहेर, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, वसाकाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शेतकरी रामदास पगार आदी उपस्थित होते.
 

Web Title: MV Bokhare awarded lifetime honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.