याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण दळवी (रा. नागपूररोड,कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे मयत संजना रूपेश ठाकरे (१८) हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन रूपेश ठाकरे यांनी डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून केला. यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात रूपेश विरुद्ध खुनाचा व व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:17 IST