पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:17 IST2021-01-19T20:53:33+5:302021-01-21T01:17:23+5:30

मालेगाव : चारित्र्याचा संशय घेऊन डोक्यात कुऱ्हाड मारून पत्नीचा निर्दयपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रूपेश नंदू ठाकरे (रा. तुळजाई कॉलनी) याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

Murder of wife on suspicion of character | पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण दळवी (रा. नागपूररोड,कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे मयत संजना रूपेश ठाकरे (१८) हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन रूपेश ठाकरे यांनी डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून केला. यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात रूपेश विरुद्ध खुनाचा व व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Murder of wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.