वगरीपाडा  येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:28 IST2021-03-22T01:28:32+5:302021-03-22T01:28:55+5:30

किरकोळ कारणावरून वाद होऊन बेदम मारहाणीमुळे एकाचा मृत्यू  झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील गांधी नगर वाठोडा येथे  उघडकीस आली आहे. 

Murder of one at Vagripada | वगरीपाडा  येथे एकाचा खून

वगरीपाडा  येथे एकाचा खून

सटाणा : किरकोळ कारणावरून वाद होऊन बेदम मारहाणीमुळे एकाचा मृत्यू  झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील गांधी नगर वाठोडा येथे  उघडकीस आली आहे. 
वग्रीपाडा वाठोडा येथील रहिवासी भीमराव उर्फ भिवा विश्वनाथ महाले (४५) हे गांधी नगर वाठोडा येथील बाबुराव खांडवी  यांच्या घरी गेले होते. बाबुराव खांडवी यांचा मुलगा नामदेव व पत्नी लीलाबाई खांडवी त्यांनी बाबुराव खांडवी यांना मारहाण केली. यानंतर बाबुराव या ठिकाणाहून निघून गेल्यावर त्यांनी भिमराव महालेला  मारहाण केल्याने भीमराव उर्फ भिवा महालेचा मृत्यू झाला. अशी फिर्याद नामदेव भीमराव खांडवी यांनी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of one at Vagripada