घरगुती वादातून मुलाकडून जन्मदात्यांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 01:40 IST2022-06-22T01:40:10+5:302022-06-22T01:40:37+5:30

घरगुती वादातून जन्मदात्यांचा खून करणाऱ्या माथेफिरू मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Murder of a child by a child in a domestic dispute | घरगुती वादातून मुलाकडून जन्मदात्यांचा खून

घरगुती वादातून मुलाकडून जन्मदात्यांचा खून

लासलगाव : घरगुती वादातून जन्मदात्यांचा खून करणाऱ्या माथेफिरू मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील दत्तात्रय रामदास सुडके (३५) या माथेफिरू मुलाने घरात सुरू असलेल्या वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व सरुबाई रामदास घोडके (६५) या आई - वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटना समजताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारी प्रदीप आजगे, कैलास महाजन, योगेश शिंदे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केली आहे. दत्तात्रय रामदास सुडके यास ताब्यात घेतले आहे. घरात वाद सुरू असल्याने रामदास याचे दुसरे लग्न झाले असून, तिला तीन महिन्यांपूर्वी माहेरी परभणी येथे सोडले आहे. सर्व व्यवहार आईच्या हातात होते. ते आपल्या हाती यावेत म्हणून रामदास वाद घालत होता, अशी माहिती असून, घटनास्थळी निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे दाखल झाले आहेत.

Web Title: Murder of a child by a child in a domestic dispute