आमदार हिरामण खोसकर यांच्या चुलत चुलत्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:17 IST2020-02-01T00:17:12+5:302020-02-01T00:17:34+5:30

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला.

 The murder of MLA Hiraman Khoskar's cousin uncle | आमदार हिरामण खोसकर यांच्या चुलत चुलत्याचा खून

आमदार हिरामण खोसकर यांच्या चुलत चुलत्याचा खून

नाशिक : इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वयोवृद्ध चुलत चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री सातपूर भागात उघडकिस आली. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. मृतदेह सातपूर भागातील फाशीच्या डोंगरालगत आढळून आला.

या घटनेत संशयित हल्लेखोरांनी प्रभाकर खोसकर (65, रा. निमगाव) यांच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने घाव घालून हत्या केली. त्यानंतर मृतदेह सातपूर परिसरातीलफाशीचा डोंगर येथे आणून टाकला. पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राकेश हांडे यांच्यासह पोलीस आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. खोसकर त्यांची हत्या नेमकी कोणी व का केली, याचा तपास लागलेला नाही. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हांडे करत आहे. मृतदेह शासकिय रूग्णालयात आणल्यावर येथे मोठी गर्दी जमा झाली होती.

Web Title:  The murder of MLA Hiraman Khoskar's cousin uncle