Murder of Malegaon corporator's brother | मालेगावी नगरसेवकाच्या भावाचा खून

मालेगावी नगरसेवकाच्या भावाचा खून

मालेगाव : लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून येथील नगरसेवकाच्या चुलत भावाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमालपुरा भागातील वॉर्ड क्रमांक १३ चे काँग्रेस नगरसेवक फारूक फैजुल्ला कुरेशी यांचा चुलत भाऊ  मोहमद फैजल कुरेशी यांचा वॉर्डातील सात ते आठ जणांनी पोटात कटरने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.  बुधवारी (दि. २१)  रात्री कमालपुरा भागात ही घटना घडली.  शहर पोलिसात रहीम खान भजिया, मजीद खान भजिया आणि सलीम खान ऊर्फ चमडा या तीन जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of Malegaon corporator's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.