महालखेडा शिवारात दिव्यांग महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:29 IST2020-07-10T00:12:33+5:302020-07-10T00:29:34+5:30

येवला तालुक्यातील महालखेडा शिवारात २७ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. ९) उघड झाली आहे. याबाबत पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder of a crippled woman in Mahalkheda Shivara | महालखेडा शिवारात दिव्यांग महिलेचा खून

महालखेडा शिवारात दिव्यांग महिलेचा खून

येवला : तालुक्यातील महालखेडा शिवारात २७ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. ९) उघड झाली आहे. याबाबत पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महालखेडा शिवारात कल्पना अशोक सोनवणे ही दिव्यांग महिला शेतातील घरात एकटीच राहत होती. गुरुवारी तिच्याकडे आलेल्या एका मुलाने घराला कडी असल्याचे पाहत दरवाजा उघडला. यावेळी सदर महिला पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. या मुलाने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेच्या डोक्यावर, पोटावर, हातावर जखमा असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे हे करत आहेत. घटनास्थळी मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरिसंग साळवे यांनी भेट देत पाहणी केली.

Web Title: Murder of a crippled woman in Mahalkheda Shivara